वार्ताहर/ कराड
ओगलेवाडी (ता. कराड) येथील कोरोना बाधित रेल्वे कर्मचाऱयाचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला असल्याने ओगलेवाडीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याच्या पुढील तपासणी करण्यात येत आहेत.
19 मार्च रोजी पटणाहून (बिहार) कराडला आलेल्या रेल्वे कर्मचाऱयास कोरोनाची लागण झाल्याचे 15 एप्रिल रोजी निष्पन्न झाले होते. त्याच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याच्या संपर्कात आलेल्या 9 रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली असता त्यांच्या अहवाल निगेटिव्ह आले होते. त्या सर्वांसह अन्य 14 कर्मचाऱयांना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
कोरोना बाधित रूग्णावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असताना 14 दिवसानंतरची त्याची पहिली तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्य विभाग व कृष्णा रूग्णालय त्याच्या पुढील तपासण्या करीत आहे. तपासणी अंती अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात येणार आहे.