प्रतिनिधी/ फलटण
सुमारे 14 लाख रुपयांची ऑनलाईन (paytm) द्वारे फसवणूक करणाऱया तिघा जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 28 जुन ते 1 जुलै दरम्यान ही घटना घडली आहे.
फिर्यादी दत्तात्रय दिनकर दडस (वय 40 रा. स्वप्नपुर्ती अपार्टमेंट कोळकी, ता. फलटण) हे लॉकडाऊन काळात कोळकी येथील आपल्या घरी आले होते. ते मुंबई पवई येथे एका कंपनीत इंजिनिअर म्हणुन काम करीत आहेत. त्यांची मुले नवी मुंबईत शाळेत शिकत आहेत. Paytm व्दारे पैसे भरण्यासाठी शाळेने लिंक पाठवली होती. लिंक ओपन झाल्यावर paytm डाऊनलोड करण्यास आरोपीने सांगितले. paytm द्वारे एक मेसेज आला. त्यात मोबाईल नंबर होता. त्या नंबरवर फोन केल्यानंतर संबधित आरोपीने 1 रूपयाचे ट्रन्जक्शन करण्यास सांगितले. ज्या इसमाने फोन घेतला त्याने लगेच upport ऍपडाऊनलोड करण्यास सांगितले. त्याव्दारे फिर्यादीच्या मोबाईलचा ऍक्सेस घेतला व वैयक्तीक माहिती मोबाईलमधुन घेवुन बँक अकाउंट व क्रेडीटकार्डमधील एकुण 13 लाख 98 हजार 271 रूपये काढुन घेतले.
आरोपी अभिषेक शर्मा, के. पी. सिन्हा, रवि कुमार अशी नावे धारण केलेल्या तिघांजणाविरूध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षण प्रताप पोमण करीत आहेत.
फिर्यादी दडस यांना आरोपीनी वेळोवेळी फोन करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. केवायसी व्हेरीफिकेशन करतो म्हणुन फिर्यादीस सांगितले होते.