क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक युवजन क्रीडा खाते बेंगळूर व कर्नाटक अमॅच्युअर खो खो संघटना यांच्या वतीने 14 वर्षाखालील मुला-मुलींची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघासाठी निवड चाचणी 10 एप्रिल रोजी गोमटेश विद्यापीठ येथे घेण्यात येणार आहे.
मुलांसाठी राणेबेन्नूर व मुलींसाठी मंडय़ा येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेत राज्यातील आठ संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय बेंगळूरमध्ये होणाऱया मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीसाठी रविवारी 10 रोजी सकाळी 10 वाजता गोमटेश विद्यापीठ हिंदवाडी, बेळगाव येथे उपस्थित रहावे. खेळाडूंचा जन्म 01/01/2008 नंतर असणे गरजेचे आहे. निवड चाचणीवेळी खेळाडूंनी सोबत आधार कार्ड, जन्म दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट, प्रगती पुस्तक यांच्या झेरॉक्स प्रती आणि तीन पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी- एन. आर. पाटील, नितीन नाईक, एल. सी. लमानी, अशोक बुडवी यांच्याशी संपर्क साधावा.