नवी दिल्ली : भारताचा 14 वर्षीय बुद्धिबळपटू आदित्य मित्तलने पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म पटकाविला. सध्या सुरू असलेल्या सर्बियन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आदित्यने 9 पैकी 7 गुण घेताना सलग तीन डावात ग्रॅण्डमास्टर्सचा पराभव केला. या कामगिरीमुळे आदित्यने पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म मिळविला.
सर्बियन खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आदित्यने सुरूवातीपासूनच दमदार कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत पहिला ग्रॅण्डमास्टर नॉर्म मिळविला. त्यानंतर त्याने सलग तीन डावात तीन ग्रॅण्डमास्टर्सना पराभूत केले. भारतीय बुद्धिबळ इतिहासामध्ये आतापर्यंत अभिमन्यू मिश्राने वयाच्या 12 व्या वर्षी ग्रॅण्डमास्टर किताब मिळविण्याचा पराक्रम केला होता. सर्बियातील स्पर्धेत आदित्यने काळय़ा मोहरा घेवून खेळताना 15 वर्षीय भारतीय ग्रॅण्डमास्टर लिऑन लूक मेन्डोन्साचा पराभव केला होता.