ऑनलाईन टीम/तरुण भारत
दक्षिण आफ्रीकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. जोहान्सबर्गमधील बारमध्ये अंदाधुंदपणे गोळीबार झाला असून या गोळीबारात १४ लोकांचा मृत्यू (१४ people killed in the shooting) झाला आहे. याच संदर्भांत पोलीस अधिकारी इलियास मावेला यांनी माहिती दिली, की ही गोळीबाराची दुर्दैवी घटना काल रात्री १२. ३० च्या सुमारास घडली.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील (Johannesburg) सोवेटो टाऊनशिपमध्ये (Soweto Township) ही घटना घडली आहे. रविवारी झालेल्या घटनेची माहिती देताना पोलीस लेफ्टनंट इलियास मावेला यांनी सांगितले की, शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाला असल्याचा आम्हाला रात्री साडेबारा वाजता फोन आला होता. त्यानंतर ज्यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, त्यावेळी केलेल्या गोळीबारात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामधील जखमी (Injured) झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी उपचारादम्यान त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढून १४ वर पोहोचला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्या बार मध्ये गोळीबार झाला तो भाग जोहान्सबर्ग येथील जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे. हल्लेखोरांनी रात्री या बार मध्ये घुसून हल्ला केला आणि अंधाधुंद गोळीबार केला आणि त्या नंतर हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहेत.