अनमोड चेकनाक्यावर अबकारी पोलिसांची कारवाई : कंटेनर चालकाला अटक
वार्ताहर /रामनगर
अनमोड अबकारी चेकनाक्मयावर गोवा बनावटीचा 898.56 लिटर दारूसाठा आणि वाहन असा 14 लाख 51 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबकारी पोलिसांनी रविवारी कारवाई करत चालकाला अटक केली आहे.
गोवा येथून कर्नाटकमार्गे आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी भागात वाहनातून चोरटय़ामार्गाने कायम गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असते. यामुळे यावर करडी नजर ठेवून अबकारी अनमोड चेकनाक्मयावर तपासणी केली जाते. रविवारी गोवा येथून आंध्रप्रदेश येथे अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर क्र. केए 01 एए 6847 यामधून गोवा बनावटीची दारू नेत असल्याची माहिती अबकारी अधिकाऱयांना मिळाली होती. यामुळे अधिकाऱयांनी वाहनांवर करडी नजर ठेवली होती. सदर कंटेनर चेननाक्यावर येताच अधिकाऱयांनी त्याची तपासणी केली असता चालकाच्या केबिनमध्ये 898.56 लिटर गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला. वाहनासहित 14 लाख 51 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई अनमोड अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत असोदे व त्यांचे सहकारी मोहन मोगेर व बाळकृष्ण एस. के. आदींनी केली.