कारण जाणून घेतल्यावर व्हाल अवाप्
4 वर्षांपासून (1460 दिवस) झोपले नसल्याचे एका 39 वर्षीय महिलेचे म्हणणे आहे. एक दुर्लभ विकार सोमनिफोबियामुळे तिला झोपच येत नाही. या आजारावर उपचार करवून घेण्यासाठी तिने स्वतःची पूर्ण बचत संपविली ओह.
महिलेचे नाव मालगोरजाटा स्लिविंस्का असून ती पोलंडची रहिवासी आहे. लोकांना एक रात्र झोप न आल्यास त्यांची अवस्था वाईट होते, मी तर अनेक आठवडे झोपू शकलेले नाही. डॉक्टरांनी यामागे सोमनिफोबिया नावाचा दुर्लभ विकार कारणीभूत असल्याचे सांगितले आहे. झोप न लागल्याने मला तीव्र डोकेदुखी होते आणि माझे डोळे कोरडे होत त्यात ज्वाळा निर्माण झाल्याचे वाटू लागते. माझी शॉर्ट टर्म मेमरी पूर्णपणे गेली असून कुठल्याही कारणाशिवाय अनेकदा माझे डोळे पाणावलेले असतात असे मालगोरजाटा यांनी सांगितले.
जीवनच कोलमडलय
सोमनिफोब्यामुळे माझे शरीर अत्यंत कमजोर झाले आहे. ऑफिसमधून मोठी सुटी घेतल्याने नोकरीही गेली. उपचारात सर्व बचत संपविली तरीही कुठलाच फायदा झालेला नाही. दुर्लभ आजारामुळे मुलगा तसेच पतीसोबतचे संबंधही बिघडू लागल्याचे त्यांचे सांगणे आहे.
कधी सुरू झाला आजार
मालगोरजाटा यांच्यानुसार सप्टेंबर 2019 मध्ये त्यांच्या कुटुंबाचे लोक स्पेनमधून परतले होते. त्याचदिवशी त्यांना झोप येत नव्हती. मी बिछान्यावर पहुडले, परंतु झोपच आली नाही. पहाटे बिछान्यातून बाहेर पडत प्रेश होऊन कामावर गेले. त्यानंतर झोप न येण्याचा क्रम सुरू झाल्याचे त्या म्हणाल्या.
उपचारानंतर….
झोपेच्या गोळय़ांनी काही तासांची झोप मिळवून देण्यास मदत केली, परंतु त्यामुळे माझे आरोग्य अधिकच बिघडत गेल्याने मी मनोवैज्ञानिक चिकित्सेची मदत घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.