Tarun Bharat

15 अब्ज डॉलर्सचे कर्ज घेण्याची पाकिस्तानची योजना

इस्लामाबाद 

  पाकिस्तान सरकारकडून डोक्यावरचे विदेशी कर्ज फेडण्यासाठी आणि विदेशी चलन भंडाराला मजबूत करण्यासाठी नवीन कर्ज घेण्यासाठीची योजना आखली जात असल्याचे समजते. यामध्ये पाक 15 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्यासाठीचे मार्ग पडताळून पाहत असल्याचे समोर आले आहे.

2020-21 या आर्थिक वर्षात 15 अब्ज डॉलर्सच्या विदेशी कर्जामधील जवळपास 10 अब्ज डॉलर्सचा वापर करण्यात येणार आहे. ही रक्कम अतिरिक्त राहणार असल्याचेही स्पष्टीकरण पाकच्या अर्थमंत्रालयाकडून दिल्याचे द एक्स्पेस ट्रिब्यून या वृत्तपत्राने  दिलेल्या माहितीमधून स्पष्ट केले आहे.

बाहेरील कर्जाचा आकडा

पाकीस्तानने सार्वजनिक पातळीवर घेण्यात आलेल्या कर्जाचा हिस्सा हा मार्चपर्यंत 86.4 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचला आहे. एका वर्षात इतक्मया मोठय़ा प्रमाणात घेण्यात येणाऱया कर्जाच्या आकडेवारीमधून पाकिस्तान कर्जामध्ये आणखी अडकत असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.

Related Stories

फ्लिपकार्टची पेटीएमबरोबर भागीदारी

Omkar B

शेअरबाजारात पुन्हा कोरोना प्रभावामुळे घसरण

Patil_p

क्लिन सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा लवकरच आयपीओ

Patil_p

गुगलने चिनची 2500 यूटय़ूब चॅनेल्स काढून टाकली

Patil_p

गोल्ड स्टॉक एक्सचेंजचा मार्ग मोकळा

Patil_p

चीनची निर्यात 30 टक्क्यांनी वाढली

Patil_p