तापसी पन्नूचा चित्रपट ओटीटीवर झळकणार
अभिनेत्री तापसी पन्नू दीर्घकाळापासून स्वतःचा आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’वरून चर्चेत आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट दसऱयाच्या वेळी 15 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म झी-5 वर प्रदर्शित होणार आहे. यासंबंधीची माहिती तापसी पन्नू हिने स्वतःच चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दिली आहे.


“ही आव्हानात्मक शर्यत सुरू झाली असून आता ती रावणदहनावेळीच संपणार आहे. रश्मिला चालू वर्षी बरेच काही नष्ट करायचे आहे. रश्मिसोबत या शर्यतीत ऑन आणि ऑफ ट्रेक धावण्यासाठी तयार व्हा, यात तुमची गरज भासेल’’ असे तापसीने म्हटले आहे.
रश्मि रॉकेट या चित्रपटात तापसीसह सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू पेन्युली आणि सुप्रिया पिळगावकर हे मुख्य भूमिकांमध्ये आहेत. आकर्ष खुराणा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट नंदा पेरियासामी यांनी लिहिलेल्या एका कथेवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.