Tarun Bharat

15 वर्षे काय मटार सोलत होतात का?

  • राबडी देवींचा सुशील मोदींना सणसणीत टोला 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


बिहार राज्यात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचार वेगाने सुरू असून एनडीए  आणि महाआघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. 


लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीका करणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी स्वतः ट्विटर करून फसले आहेत. 

एका प्रचार सभेत सुशील मोदी म्हणाले होते की, जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही. त्यांच्या या वक्तव्या संदर्भात अनेक बातम्या वर्तमानपत्र छापून आल्या. त्यातील एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विट केली. मोदी यांचे ट्विट रिट्विट करत राबडीदेवी यांनी निशाणा साधला आहे. 


राबडीदेवी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, लो कर लो बात.. पंधरा वर्षे काय मटार सोलत होतात का? बिहार मध्ये रोजगारी आहे हे नितीश कुमार आणि सुशील मोदी यांना पंधरा वर्षानंतर समजले आहे. तेजस्वी तुम्हां लोकांना आता मुद्द्यावर आधारित राजकारण शिकवेल, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.   

Related Stories

यूएईच्या होप प्रोब दुर्बिणीने शोधले रहस्यमय अरोरा

Archana Banage

17 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प शक्य

Patil_p

राज्यात 299 रुग्णांची भर

Patil_p

दिल्लीच्या पंत रुग्णालयात वादंग

Patil_p

कोरोना रोखण्यासाठी उपाययोजनांना वेग

Patil_p

दुचाकीला कारची पाठीमागुन धडक; आजोबा ठार तर नातू गंभीर जखमी

Abhijeet Khandekar