केंद्र सरकारकडून नियमावली प्रसिद्ध : 50 टक्के सीट्स आरक्षित करता येणार : पाकिटबंद खाद्यपदार्थ मिळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनादरम्यान 7 महिन्यांनी खुल्या होणाऱया मल्टीप्लेक्ससाठी केंद्र सरकारने मंगळवारी नियमावली प्रसिद्ध केली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरित भागांमध्ये 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेसह मल्टीप्लेक्स आणि चित्रपटगृहे सुरू करता येणार आहेत, परंतु शारीरिक अंतर राखावे लागणार आहे. दोन जणांमधील एक सीट रिकामी ठेवावी लागणार आहे. तसेच कोरोनाविषयक जागृतीसंबंधी एक माहितीपट दाखवावा लागेल. प्रत्येक शो झाल्यावर पूर्ण हॉल सॅनिटाइज करावा लागणार आहे.
प्रवेश कसा मिळणार
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी संपर्क क्रमांक द्यावा लागणार
थर्मल स्क्रीनिंग केले जाणार
मास्क वापरावा लागणार
प्रवेश-बाहेर पडण्याचा मार्ग आणि सामूदायिक क्षेत्रात हँड सॅनिटायजरची व्यवस्था करावी लागणार आहे. ही व्यवस्था स्पर्शरहित असण्याचा प्रयत्न केला जावा.
लक्षणेरहित लोकांनाच प्रवेश द्यावा लागेल
दिशानिर्देश न मानणाऱयांच्या विरोधात कठोर भूमिका.
आसनव्यवस्था कशी असणार
चित्रपटगृहात 50 टक्क्यांपेक्षा अधिक जणांना प्रवेश नाही.
एकानंतर एक आसन रिकामे ठेवूनच बुकिंग होऊ शकेल.
उर्वरित आसनांवर नॉट टू बी ऑक्यूपाइड लिहिलेले असेल.
अशा आसनांवर टेप किंवा मार्कर लावलेला असणार आहे.
एकाच्या मागे एक व्यक्ती बसू शकणार नाही.
रिकामी आसनांमागील आसन बुक केले जाणार.
चित्रपटगृहात शिरल्यावर काय होणार
केवळ पाकिटबंद खाद्यपदार्थांचा अनुमती असून याकरता अधिक काउंटर ठेवावे लागतील. ऑनलाईन पेमेंटला चालना द्यावी लागणार.
हॉलच्या आत खाद्यपदार्थ तसेच शीतपेयांची डिलिव्हरी मिळणार नाही.
लोकांना रांगेत आत तसेच बाहेर पडता यावे याकरता मध्यांतराचा वेळ वाढविला जाऊ शकतो.
एक्सेस पॉइंट्स, ऑनलाइन सेल्स पॉइंट, लॉबी आणि स्वच्छतागृहात लोकांना संक्रमणापासून वाचविण्याच्या उपाययोजना कराव्या लागणार.
दोन शोंदरम्यानचा वेळ वेगवेगळा असणार आहे.
एक शो संपल्याची आणि दुसरा शो सुरू झाल्याची वेळ एकच ठेवता येणार नाही.
एक शो संपल्यावर लोकांना त्यांच्या आसनाच्या रांगेनुरुप बाहेर काढले जाईल, जेणेकरून डिस्टन्सिंग राहिल.
एक शो संपल्यावर पूर्ण हॉल सॅनिटाइज होईल, त्यानंतरच दुसऱया शोसाठी लोक येऊन बसतील.
एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्यास पूर्ण परिसराचे निजंर्तुंकीकरण करावे लागणार.
चित्रपटगृहात अन्य कुठल्या व्यवस्था असतील
शोपूर्वी आणि नंतर तसेच मध्यातंरापूर्वी आणि नंतर कोरोनाविषयक जागृतीकरता 1 मिनिटांचा माहितीपट दाखवावा लागेल.
हॉलबाहेर 6 फूटांच्या अंतरासाठी जमिनीवर मार्कर लावलेले असतील.
क्रॉस व्हेंटिलेशन असावे आणि एसी 24 ते 30 अंश सेल्सिअसवर असावा.
एकपडदा चित्रपटगृहात तिकीट बुकिंगसाठी अधिक दालने सुरू करावी लागणार.
ऑनलाईन तिकीट बुकिंगला चालना देण्यात येणार.
तिकीट बुकिंग दिवसभर असावी, आगावू बुकिंगची सुविधा मिळावी.
आरोग्य ऍपच्या वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उर्वरित खाद्यपदार्थ आणि शीतपेयांना सुरक्षितपणे हटविण्यात यावे.