?लॉकडाऊनच्या शक्यतेचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादांकडून मीडियाने घेतले वदवून
सातारा प्रतिनिधी ः कोरोनाशी दोन हात करण्यामध्ये लसीकरण महत्वाची भूमिका बजावते. त्या अनुषंगाने सोमवारी जिह्यातील 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड झाले. गुरुकुल ही देशातील पहिली शाळा 100 टक्के लसीकरण करणारी शाळा ठरली आहे. जिह्यात नव्याने आढळून आलेल्या बाधितमध्ये एकटय़ा सातारा तालुक्यातील 23 जण आहेत. खटाव आणि पाटण तालुक्यात 0 आहेत.
मुलांच्या लसीकरणात गुरुकुल देशात पहिले
सरकारने मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला. त्यानुसार जिह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले. सातारा शहरातील गुरुकुल ही शाळा देशात पहिली शाळा ठरली की शाळेतील सर्व विध्यार्थी पहिल्याच दिवशी लसवंत ठरले. हा इतिहास शाळेचे संस्थापक राजेंद्र चोरगे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्यामुळे झाला आहे.
लॉकडाऊनच्या शक्यतेचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादांकडून मीडियाने घेतले वदवून
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे सातारा दौऱयावर सोमवारी आले होते. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी भवनात पत्रकारांनी गाठले. कोरोनाविषयी छेडत त्यांच्याकडून असेच आकडे वाढत राहिले तर लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे, असे व्यक्तव्य वदवून घेतले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विनाकारण पॅनिक वातावरण होण्याची शक्यता जिह्यातून वर्तवली जात आहे. त्यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी खास चार हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले.
बाधित वाढ लागली घटू
गेल्या दोन दिवसात जिह्यातील बाधित संख्या वाढत चालली होती. त्यामुळे भीतीचे वातावरण मीडियाच्या माध्यमातून निर्माण होण्याची भीती सर्वसामान्य व्यक्त होत होती. परंतु सोमवारी सकाळी जाहीर झालेला आकडा पहाता पुन्हा जिल्हा मूळ पदावर येत आहे. नव्याने बाधित आढळून आलेल्यामध्ये जावली 2, कराड 4, खंडाळा 4, खटाव 0, कोरेगाव 1, माण 3, महाबळेश्वर 3, पाटण 0, फलटण 10, सातारा 23, वाई 3, इतर 6, एकूण 59 बाधित आहेत. तालुकानिहाय आतापर्यंत मृत्यू व बाधित कंसात मृत्यू पुढीलप्रमाणे ः जावली 10,071(226), कराड 39,967(1254), खंडाळा 14,247(198), खटाव 25,989(662), कोरेगाव 22,017(519), माण 18097(429), महाबळेश्वर 4784(89), पाटण 10,166(377), फलटण 37,591(700), सातारा 52,396(1546), वाई 15,828(404), इतर 2231(94), एकूण 2,52,784(6498).