काशी / वृत्तसंस्था
कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी काशीने अयोध्येचा विक्रम मोडला आहे. अयोध्येत दिवाळीत 12 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यानंतर आता काशीमध्ये देव दीपावलीनिमित्त शुक्रवारी 84 गंगा घाटांवर 15 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. यादरम्यान 84 घाटांवर 2 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. तसेच बरेच पर्यटक गंगेत बोटीतून प्रवास करत होते. तसेच गंगेत छोटय़ा-मोठय़ा बोटी, स्टीमर्स, बार्जेस आणि क्रूझमध्येही दिपोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर फायरबॉक्समधून आकाशात फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. घाटांवर होणारी गर्दी पाहता प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. गर्दी रोखण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आली होती. तपासणी करूनच लोकांना घाटाकडे जाण्यास परवानगी देण्यात येत होती.