Tarun Bharat

जूनमध्ये इएसआयसी योजनेत जोडले 15.47 लाख सदस्य

Advertisements

एनएसओ यांच्याकडून अहवाल सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जून 2022 मध्ये सुमारे 15.47 लाख नवीन ग्राहक कर्मचारी राज्य विमा महामंडळ (इएसआयसी) द्वारे चालविण्यात येणाऱया सामाजिक सुरक्षा योजनेत सामील झाले. याबाबतची अधिकृत आकडेवारी सादर करण्यात आली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. नवीन आकडेवारी भारतातील रोजगाराच्या दृष्टीकोनातून वेतन-सांख्यिकी-जून-2022 यांच्या या अहवालाचा भाग आहे. हा अहवाल नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (एनएसओ) ने प्रसिद्ध केला आहे.

अहवालानुसार, इएसआयसीमध्ये 2021-22 मध्ये एकूण नवीन नोंदणी वाढून 1.49 कोटी झाली आहे. हा आकडा 2020-21 मध्ये 1.15 कोटी, 2019-20 मध्ये 1.51 कोटी आणि 2018-19 मध्ये 1.49 कोटी होता. सप्टेंबर 2017 ते मार्च 2018 पर्यंत सुमारे 83.35 लाख नवीन ग्राहक इएसआयसीच्या योजनांमध्ये सामील झाले होते. सप्टेंबर 2017 ते जून 2022 पर्यंत एकूण नवीन नोंदणी 6.92 कोटी होती, असे अहवालात म्हटले आहे. एनएसओ अहवाल इएसआयसी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) आणि पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआयडीए) द्वारे चालवल्या जाणाऱया विविध सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सामील झालेल्या नवीन सदस्यांच्या डाटावर आधारित देण्यात आला आहे.

Related Stories

आर्थिक कंपन्यांच्या मजबूतीने सेन्सेक्स झेपावला

Patil_p

ऑटो कंपन्यांचे काम पूर्ववत

Patil_p

पेटीएमवर नवीन सुविधा

Patil_p

नेस्लेच्या निव्वळ नफ्यात 14 टक्के वाढ

Patil_p

‘फॉरेक्स’, ‘एफडीआय’ नि चलनवाढ!

Omkar B

मायक्रोसॉफ्ट टीम्स ऍपमध्ये 250 जणांना एकत्रित बैठकीची सोय

Patil_p
error: Content is protected !!