कोल्हापूरः महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाअंतर्गत कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मार्च 2022 च्या अर्थ संकल्पामध्ये 15 रुपये कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्टेट हायवे, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गाचा समावेश असल्याची माहीती खासदार संजय मंडलिक यांनी दिली.
जिह्यातील चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर, श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता राज्य मार्ग 201 कि. मी. सुधारणेसह आर.सी.सी. गटर्स बांधकाम करण्यासाठी 50 लाख, चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर, श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता रा. मा. 201 कि. मी. तालुका आजरा सुधारणा करण्याकरता 1 कोटी, चंदगड, इब्राहिमपूर, चितळे, जेऊर श्रृंगारवाडी, हत्तीवडे, महागाव रस्ता रा.मा. 201 कि. मी. ता. गडहिंग्लज सुधारणा करण्यासाठी 4 कोटी, कोल्हापूर (शेंडापार्क जवळून) कंदलगांव, कोगीलखुर्द इतर जिल्हा मार्ग 74 कि. मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 2 कोटी 85 लाख, प्रमुख जिल्हा मार्ग 41 पासून चक्रेश्वरवाडी – बारडवाडी – भैरेवाडी – ठिकपुर्ली – निगवे खालसा इजिमा 59 कि. मी. मध्ये डांबरीकरण करण्यासाठी 95 लाख, सांगरुळ, म्हारुळ, बहिरेश्वर, कोगे, कोगेपाटी, एम. एस. ई. बी ते बरसोबा देवालय ते रा. मा. 194 ला मिळणारा इजिमा क्र. 70 कि. मी. मधील रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 95 लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग मार्ग क्र. 4 ते चित्रनगरी ते इतर जिल्हा मार्ग क्र. 74 ला मिळणारा ग्रामीण मार्ग 49 कि. मी. रुंदीकरणासह सुधारणा करणेकरता 1 कोटी 90 लाख, इतर जिल्हा मार्ग क्र. 186 पासून निगवे खालसा ते परिते मार्गे ग्रामीण मार्ग क्र. 80 कि. मी.मध्ये डांबरीकरण करण्यासाठी 95 लाख, ग्रामीण मार्ग क्र. 122 ते धनगरवाडा वसाहतीजवळून प्रमुख जिल्हा मार्ग 29 ला मिळणारा रस्ता ग्राणीण मार्ग क्र. 127 कि. मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 95 लाख, राज्य मार्ग क्र. 194 पासून भुये, राजाराम वेअर रस्ता ग्रामीण मार्ग क्र. 12 कि.मी. च्या रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 95 लाख मंजूर झाले असून सदर कामांचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता व वर्क ऑर्डरची प्रक्रिया पुर्ण होवून पावसाळ्यानंतर या कामांना सुरुवात होईल. तसेच जिह्यातील इतर रस्त्यांच्या सुधारणांसाठी शासनाकडे पाठपुरावा करुन जास्तीत जास्त निधी आणणेसाठी प्रयत्न केला जाईल असेही खासदार मंडलिक यांनी सांगितले.