तेहरान : इराणमधील शिराजमध्ये बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. शाह चेराग या शिया समुदायाच्या प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. काही हल्लेखोरांनी लोकांवर गोळीबार सुरू केल्यानंतर उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. तसेच धावपळही सुरू झाल्याने चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबार करणारे तिघेजण हल्ल्यानंतर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या गोळीबारानंतर परिसरात नाकाबंदी करून सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.
Previous Articleकंत्राटी कर्म`चाऱयांच्या मानधनावर ठेकेदाराचा डल्ला
Next Article सचिन वालावलकर यांना मातृशोक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.