Tarun Bharat

1500 मी.इनडोअर शर्यतीत गुडाफ त्सेगेचा नवा विश्वविक्रम

Advertisements

वृत्तसंस्था/ पॅरिस

फ्रान्समधील लीव्हिन येथे झालेल्या इनडोअर ऍथलेटिक्स स्पर्धेत इथिओपियाच्या गुडाफ त्सेगेने महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत नवा विश्वविक्रम नोंदवत सुवर्ण पटकावले. तिने 3 मिनिटे 53.09 सेकंदाचा नवा इनडोअर विक्रम नोंदवला.

तिचीच देशवासी गेन्झेबे दिबाबाने 2014 मध्ये कार्लस्रुहे येथे झालेल्या इनडोअर स्पर्धेत नोंदवलेला विक्रम गुडाफने दोन सेकंदाने मागे टाकला. अमेरिकेच्या ग्रँट हॉलोवेने पुरुषांच्या 60 मी. हर्डल्समध्ये दुसऱया क्रमांकाची सर्वात वेगवान वेळ नोंदवताना 7.32 सेकंदात शर्यत पूर्ण केली. या प्रकारात कॉलिन जॅक्सनच्या नावे विश्वविक्रम असून 7.30 सेकंदाची वेळ त्याने 1994 मध्ये नोंदवली होती. ‘मला या कामगिरीचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. कारण मी सातत्याने 7.40 सेकंदापेक्षा कमी वेळ नोंदवण्यासाठीच प्रयत्न केले आहेत,’ असे विद्यमान हर्डल्स वर्ल्ड चॅम्पियन हॉलोवे म्हणाला.

पुरुषांच्या 3000 मी. इनडोअर शर्यतीत इथिओपियाच्या गेटनेट वेलला विश्वविक्रम मोडण्यात केवळ 0.08 सेकंद कमी पडले. त्याने 7 मिनिटे 24.98 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. त्यामुळे डॅनियल कोमेनचा 1998 मध्ये नोंदवलेला विश्वविक्रम अबाधित राहिला. जेकब इन्गेब्रिगस्टनने पुरुषांची 1500 मी. शर्यत 3 मिनिटे 31.80 सेकंदात पूर्ण केली. इनडोअरमधील ही पाचव्या क्रमांकाची सर्वात वेगवान वेळ असून युरोपियन स्पर्धेतील हा नवा विक्रम आहे. स्वीडनच्या आर्मंड डुप्लांटिसने पुरुषांच्या पोल व्हॉल्टमध्ये 5.86 मी. अंतर नोंदवले. त्याने फक्त एकदाच उडी घेतली. त्यावेळी बार पार करताना त्याला वेदना होत असल्याचे भाव त्याच्या चेहऱयावर दिसून आले. त्यामुळे त्यानंतर त्याने पुढचे प्रयत्न सोडून दिले. पण एकच उडी त्याला सुवर्ण मिळवून देण्यास पुरेशी ठरली. पुरुषांच्या लांब उडीमध्ये क्युबाच्या जुआन मिग्वेल एचेवारियाने 8.25 मी. उडी घेत सुवर्ण पटकावले. तो 2018 मधील इनडोअर वर्ल्ड चॅम्पियन आहे.

Related Stories

भारत विजयापासून सात पावलांवर

Patil_p

ऑलिंपिक स्पर्धेतून वावरिंका, हॅलेपची माघार

Patil_p

संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा ड्रॉ जाहीर

Patil_p

न्यूझीलंडच्या बार्कले यांना भारताचा पाठिंबा?

Patil_p

ऍश्ले बार्टी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू

Amit Kulkarni

निवड समितीसाठी शिवरामकृष्णन, चौहान, अमेय खुरासियांचे अर्ज

Patil_p
error: Content is protected !!