वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जेएमसी प्रोजेक्ट्स लिमिटेड (जेएमसी) यांना बांधकाम आणि पाण्याशी संबंधीत प्रकल्पांसाठी 1,524 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर मिळाली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. ऊर्जा क्षेत्रातील कंपनी कल्पतरु पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड(केपीटीएल) यांच्या माहितीनुसार जेएमसी आशियातील 1,012 कोटी रुपयाच्या विमानतळ विकासाशी संबंधीत इंजिनिअरिंग, खरेदी आणि निर्मिती प्रकल्प आदीची ऑर्डर मिळाली आहे. यासोबतच 370 कोटी रुपयांची पाणी योजना प्रकल्प आणि 142 कोटी रुपयाची इमारत व कारखाना आदी कामांचा यामध्ये समावेश राहणार आहे. आम्हाला नवीन ऑर्डर मिळाल्याने आनंद होत आहे, असे जेएमसीचे सीईओ एसके त्रिपाठी यांनी मत व्यक्त केले आहे.