Tarun Bharat

Gandhi Jayanti : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Gandhi Jayanti छ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५३ वी जयंती आहे. या निमित्ताने राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन करण्यात आले. यावेळी भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तसेच, गांधीजींनाअभिवादन करण्यापूर्वी पीएम मोदींनीही ट्विट केले. ट्विट करून त्यांनी यावेळी यंदा गांधी जयंती खूप खास असल्याचे सांगितले. गांधी जयंतीचे महत्त्वही त्यांनी लोकांना सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासाठी श्रद्धांजलीपर ट्विटही केले. गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींना श्रद्धांजली, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. ही गांधी जयंती आणखी विशेष आहे कारण भारत स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे. मी जनतेला आवाहन करतो की, बापूंच्या आदर्शांचे पालन करावे. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून मी तुम्हा सर्वांना खादी आणि हस्तकला उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन करतो.

पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही ट्विट करून आदरांजली वाहिली. त्यांनी लिहिले की लाल बहादूर शास्त्री त्यांच्या साधेपणासाठी आणि निर्णायकतेसाठी संपूर्ण भारतात प्रशंसनीय आहेत. इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या काळात त्यांचे कणखर नेतृत्व सदैव स्मरणात राहील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

Related Stories

86 व्या वषीही स्केटिंगचा उत्साह

Patil_p

महाकाय शार्क माशाचे प्राण वाचवण्यात यश

Amit Kulkarni

अमित शहांचा मुंबई दौरा; ‘मिशन मुंबई’ महापालिकेचा करणार शुभारंभ

Archana Banage

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

Patil_p

मुलांना शिकविण्यासाठी आम्रवृक्षावरच स्टुडिओ

Amit Kulkarni

स्नेक प्लान्ट ठेवणार ऑक्सिजन पातळी नियंत्रित

Patil_p
error: Content is protected !!