Tarun Bharat

16 वी जिल्हास्तरीय स्केटिंग चॅम्पियनशिप उत्साहात

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 16 वी जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात पार पडली. केएलई सोसायटी संचलित महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला. क्वाड स्केटिंग आणि इनलाइन स्केटिंग अशा दोन प्रकारात 500 मीटर आणि 1000 मीटर अंतराचे इव्हेंट्स घेण्यात आले.

क्वाड स्केटिंगमध्ये 5 ते 7 वयोगट मुलांच्या विभागात श्रीयांश पांडेने 2 सुवर्ण, अन्वकि शिंगडीने 2 रौप्य, शिवाय पाटीलने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात झिया काझीने 2 सुवर्ण, रियांशी महागावकरने 2 रौप्य, अनन्या पाटीलने 2 कांस्यपदके मिळविली. 7 ते 9 वयोगट मुलांच्या विभागात आर्या कदमने 2 सुवर्ण, स्वयम पाऊसकरने 1 रौप्य, 1 कांस्य, सदगुण मधेदने 1 कांस्य, 1 रौप्य,  धैर्यशील हटकरने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात आराध्या पी. हिने 2 सुवर्ण, प्रांजल पाटीलने 2 रौप्य, कृतिका सावीने 1 कांस्य, दुर्वा पाटीलने 1 कांस्यपदक पटकाविले.

9 ते 11 वयोगट मुलांच्या विभागात कुलदीप बिर्जेने 2 सुवर्ण, सर्वेश पाटीलने 2 रौप्य, अभय पाटीलने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात खुशी अगसीमनीने 2 सुवर्णपदके मिळविली. 11 ते 14 वयोगट मुलांच्या विभागात सौरभ साळुंखेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, गौरांग खोतने 1 सुवर्ण, 1 रौप्य तसेच सत्यम पाटीलने 2 कांस्यपदके तर मुलींच्या विभागात जान्हवी तेंडुलकरने 2 सुवर्ण, अनघा जोशीने 2 रौप्य, अमरीन ताजने 2 कांस्यपदके मिळविली. 14 ते 17 वयोगट मुलांच्या विभागात यशवर्धन परदेशीने 2 सुवर्ण, हर्षवर्धन दबाडेने 2 रौप्य तर श्री रोकडेने 2 कांस्य तसेच मुलींच्या विभागात विशाखा फुलवालेने 2 सुवर्ण,  सानिका कंग्राळकरने 2 रौप्य, हर्षिका चौगुलेने 2 कांस्यपदके पटकाविली.

ईनलाइन स्केटिंगमध्ये 5 वर्षाखालील वयोगट मुलींच्या विभागात प्राजक्ता पाटीलने 2 सुवर्ण, 5 ते 7 वयोगट मुलांच्या विभागात विदित कल्याणकुमारने 2 सुवर्ण, विहान सहकारीने 2 रौप्य, रुधव मोहिरेने 1 कांस्य, विश्वतेज पवारने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात सिया एन.ने 2 सुवर्ण, आरोही शिलेदारने 2 रौप्य आणि वसुंधरा बाकळेने 2 कांस्यपदके मिळविली. 7 ते 9 वयोगट मुलांच्या विभागात वरुण सहकारीने 2 सुवर्ण, समर्थ मराठेने 2 रौप्य, अर्शन माडीवालेने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात आराध्या बामनगोळने 2 सुवर्ण, आर्या नेथेने 2 रौप्यपदके पटकाविली. 9 ते 11 वयोगट मुलांच्या विभागात अवनीश कोरीशेट्टीने 2 सुवर्ण, ध्रुव कुलकर्णीने 2 रौप्य, शिवेंद्र पवारने 2 कांस्यपदके तर मुलींच्या विभागात श्रावणी भिवसेने 1 सुवर्ण, 1 रौप्य, अनन्या सहकारीने 1 रौप्य, 1 सुवर्ण तर अन्वी सोनारने 2 कांस्यपदके पटकाविली. 11 ते 14 वयोगट मुलांच्या विभागात साईराज मेंडकेने 2 सुवर्ण, अनराय ढवळीकरने 2 रौप्य, अथर्व भुतेने 1 कांस्य, प्रीतम नीलाजने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात सानवीने 2 सुवर्ण, श्रेया इरसन्नवरने 2 रौप्यपदके मिळविली. 17 वर्षांवरील मुलांच्या विभागात आदित्य बाळीकाईने 2 सुवर्ण तर रुद्र गुगेरीने 2 रौप्यपदके पटकाविली.

शिवराज, झफरुल्लाह माडीवाले, आकाश पठाडे, सचिन साळुंखे, तुकाराम पाटील, बसवराज कोरीशेट्टी, नयना शिवराज, कोरीशेट्टी, मेंडके, रमेश परदेशी, गणेश दड्डीकर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, भरत पाटील, प्रकाश पाटील, सागर, विनायक, प्रशांत कांबळे, बसवंत चौगुले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Stories

कर भरण्यास मुदत वाढवून द्या

Amit Kulkarni

‘त्या’ माथेफिरूंवर कारवाई करा

Patil_p

धर्मवीर ज्वालेचे गावोगावी पूजन

Amit Kulkarni

शहरातील 25 मंदिरांना शिवप्रतिमेचे वितरण

Patil_p

भीषण अपघातात मुख्याध्यापकासह शिक्षक ठार

Patil_p

लठ्ठपणा तपासणीसाठी डॉ. सुरेंद्र उगाळे मंगळवारी अरिहंत हॉस्पिटलमध्ये

Amit Kulkarni