भुवनेश्वर : कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेले ओडिशातील जगन्नाथ पुरी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येत आहे. 16 ऑगस्टपासून मंदिर दर्शनाची सुविधा सुरू होणार आहे. पण मंदिरात दर्शनासाठी लसीकरण प्रमाणपत्र आणि आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवालाची गरज भासणार आहे. मागील महिन्यात जगन्नाथ यात्रा कोरोना महामारीमुळे सलग दुसऱया वर्षी भाविकांशिवाय पार पडली होती. रथयात्रेदरम्यान सर्व दिशानिर्देशांचे पालन करण्यात आले होते. ही रथयात्रा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार आयोजित करण्यात आली होती. सुमारे हजार अधिकाऱयांना रथयात्रेकरता तैनात करण्यात आले होते.
Previous Articleहिंदी वेबसीरिजमध्ये दिसणार तमन्ना भाटिया
Next Article कराडची एकूण रूग्ण संख्या 35 हजारांवर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.