वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना काळात शेअर बाजार सुरूवातीला घसरणीत होता पण नंतर मात्र बाजाराने चढती कमानच कायम ठेवली आहे. 2020 मध्ये बाजारात 16 फर्म्सनी 31 हजार कोटी रुपये उभारले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2021 मध्ये यात पुन्हा वाढ होण्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
मार्चमध्ये कोरोनामुळे शेअर बाजारात घसरण दिसली. लॉकडाऊन उठवल्यानंतर व्यवहार सुरळीत झाल्यावर मात्र शेअर बाजाराने सावरत तेजीचा प्रवास सुरू केला. जुलैमध्ये रोसारी बायोटेकचा आयपीओ सादर करण्यात आला. एसबीआय कार्डच्या यशस्वी आयपीओतील पदार्पणावेळी रोसारी बायाटेकला आयपीओ मार्चमध्ये आणायचा होता. पण रोसारीने आयपीओ सादरीकरण त्यावेळी थांबवले होते. कोरोनाच्या परिस्थितीत जुलैमध्ये आयपीओ दाखल केल्यानंतर रोसारीला चांगला प्रतिसाद मिळाला.
माइंडस्पेस बिझनेस पार्कस् रीटचा जुलैमध्ये आयपीओ आला. पण ऑगस्टमध्ये एकही आयपीओ सादर झाला नाही. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मात्र आयपीओ सादर करणाऱया कंपन्यांची संख्या वाढली. हॅप्पियस्ट माइंडस टेक्नॉलॉजीस, रुट मोबाइल, कॅम्स, केमकॉन स्पेशॅलिटी केमिकल्स, अँजल ब्रोकिंग, युटीआय एएमसी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, लिखीता इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक यांनी आयपीओ बाजारात दाखल केले. यापाठोपाठ ग्लँड फार्माचा आयपीओ नोव्हेंबरमध्ये तर बर्गर किंग इंडिया, मेजर्स बेक्टर्स फूड स्पेशॅलिटीज आणि अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल यांचे आयपीओ डिसेंबरमध्ये बाजारात दाखल झाले होते.
बहुतेक जास्तीत जास्त आयपीओंना गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणा तसेच बाजाराची मजबुत पकड या गोष्टी आयपीओंना प्रतिसाद मिळण्यामागची सांगितली जातात. 2020 मध्ये एकंदर 16 आयपीओ सादर करण्यात आले. मागच्या वर्षी 17 आयपीओ सादर करण्यात आले होते. यावर्षी 16 फर्म्सनी 31 हजार कोटी उभारले आहेत. तर मागच्या वर्षी 17 हजार 433 कोटी रुपये उभारले होते.
तक्ता पुढीलप्रमाणे
कंपनी | महिना | इश्यु आकार |
एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस | मार्च | 10340 |
रोसारी बायोटेक | जुलै | 496 |
माईंड स्पेस बिझनेस पार्क्स | जुलै | 4500 |
हॅप्पियस्ट माईंड टेक्नॉलॉजीस | सप्टेंबर | 702 |
रुट मोबाईल | सप्टेंबर | 600 |
कॅम्स (ण्Aश्ए) | सप्टेंबर | 2244 |
केमकॉन स्पेशॅलिटी केमिकल्स | सप्टेंबर | 318 |
एंजल ब्रोकिंग | सप्टेंबर | 600 |
युटीआय एएमसी | ऑक्टोबर | 2159 |
माझगावडॉक शिप बिल्डर्स | ऑक्टोबर | 443 |
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक | ऑक्टोबर | 517 |
लिखीता इन्फ्रास्ट्रक्चर | ऑक्टोबर | 61.2 |
ग्लँड फार्मा | नोव्हेंबर | 6479 |
बर्गरकिंग इंडिया | डिसेंबर | 810 |
मेजर बेक्टर्स फूड स्पेशालिटीज | डिसेंबर | 540 |
अँटोनी वेस्ट हँडलिंग सेल | डिसेंबर | 300 |
एकूण निधी उभारणी | 31109.2 |