कराड येथे अटक : अवघ्या 47 तासात चोरी उघड : बकऱयाची आटपाडीत वाजतगाजत मिरवणूक : पोलिसांचाही केला गौरव
प्रतिनिधी/आटपाडी
आटपाडीतील प्रसिद्ध 16 लाखाचा बकरा चोरीच्या घटनेचा पोलिसांनी पर्दाफाश केला. फिल्मी स्टाईलने बकरा चोरी करणाऱया तिघांना पोलिसांनी जेरबंद करत कराड (जि. सातारा) येथून हा लक्षवेधी बकरा हस्तगत केला. जिव्हाळा आणि आस्मितेचा विषय बनलेल्या बकऱयाची चोरी अवघ्या 47 तासात उजेडात आणल्याने पोलिसांचा मेंढपाळांनी गौरव शहरातून जल्लोषी मिरवणूक काढली.
आटपाडी आंबेबनमळा नं. 2 येथील सोमनाथ जाधव यांच्या मालकीचा माडग्याळी जातीचा बकरा सध्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. अवघ्या सहा महिने वयोमान असलेल्या या बकऱयाला आटपाडीच्या कार्तिक पौर्णिमा बाजारात 16 लाखाला मागणी झाली होती. हा बकरा पाहण्यासाठी मेढपाळ, हौशी पशुपालक सातत्याने गर्दी करत होते. देखणा आणि आकर्षक ठेवण यामुळे हा बकरा लक्षवेधी ठरला होता.
शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चारचाकी गाडीतून आलेल्या चोरटÎांनी ट्रान्स्फॉर्मरवरून वीज पुरवठा खंडीत करत सोमनाथ जाधव यांचा हा बकरा चोरून नेला. मुळात हा बकरा म्हणजे आस्मिता आणि जिव्हाळÎाचा विषय होता. शिवाय तो पोटच्या गोळÎाप्रमाणे सांभाळल्याने सोमनाथ जाधव यांना अश्रू अनावर झाले. अनेक मेंढपाळांना गहिवरून आले. ही चोरी जवळच्या लोकांनीच केल्याचा संशय पोलिसांना होता.
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी पोलिसांनी तपासाची सुत्रे हलविली. युवा नेते दत्तात्रय पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या साथीने सोमनाथ जाधव यांचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घेतला. आटपाडीतील एका वॅगन-आर गाडीतून हा बकरा चोरल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आल्याने त्यांनी ती गाडी शोधली. त्या गाडीतून बकरा चोरून नेल्याचा वास पोलिसांनी अचूक हेरला आणि अमोल उर्फ बाळू दत्तात्रय जाधव, सुदाम दीपक नलवडे आणि एक अल्पवयीन या तिघांना जेरबंद केले.
तिघांनी चोरलेला बकरा पोलीसांनी कराडातून हस्तगत केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार पवार, रामचंद्र खाडे, दिग्विजय कराळे, नितीन मोरे, प्रमोद रोडे, सचिन पाटील या पोलिसांनी ही कामगिरी फत्ते केली. त्यांना दत्तात्रय पाटील यांनी विशेष साथ दिली. पोलिसांनी बकरा चोरी उजेडात आणल्याचे कळताच सांगली, सोलापूर, सातारा जिल्हÎासह कर्नाटकातील मेंढपाळ बांधवांनी आटपाडीत गर्दी केली. सर्व मेंढपाळांनी आटपाडी पोलीसांचा विशेष गौरव केला.
युवा नेते दत्तात्रय पाटील, ऍड. धनंजय पाटील, अनिल पाटील यांच्यासह मान्यवरांनी बकरा तपासाबाबत पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बकरा मालक सोमनाथ जाधव यांनी बक्षीसापोटी जाहीर केलेली रक्कम पोलिसांनी नाकारत तपासातील यशानंतरच्या गौरवाप्रती आनंद व्यक्त केला. एकमेकांना पेढे भरवत आणि लोकांना पेढÎाचे वाटप करत मेंढपाळ बांधवांनी आटपाडी शहरातून सवाद्य मिरवणूक काढून 16 लाखाच्या चोरीला गेलेल्या बकऱयाचा पुन्हा मिळण्याचा आनंद साजरा केला.
मेंढपाळांना आनंदाश्रू
16 लाखाची मागणी झालेला बकरा चोरीला गेल्याने मालक सोमनाथ जाधव यांच्यासह त्यांचे नातेवाईकच नव्हे तर समस्त मेंढपाळ बांधवांनी टाहो फोडला. अनेकांनी दु:ख व्यक्त केले. तर आटपाडीतीलच तीन चोर उजेडात आणून बकरा शोधल्यानंतर मालकासह सर्वांच्याच डोळÎात आनंदाश्रू तरळले. नेहमी मोर्चा, आंदोलनांसह टिकेचा विषय ठरणाऱया पोलीस बांधवांनाही मेंढपाळांनी केलेला गौरव प्रेरणादायी ठरला. तर या सेलिब्रेटी बकऱयासह फोटो काढण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली.