विजय मर्चंट चषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बीसीसीआयच्या विजय मर्चंट 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक संघात 27 संभाव्य खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात बेळगावच्या सिद्धेश असलकरची वर्णी लागली आहे.
जानेवारीमध्ये होणाऱया विजय मर्चंट चषक 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटकने 27 खेळाडूंचा संभाव्य संघ निवडला आहे. त्यात शिवम एम. बी., कार्तिक्मया के. पी., यश जाधव, शिशिर आर. समर्थ एन., गौरव शानभाग, अगस्ता राजू, विवेक नाईक, मोनिश एस., राम वेंकटेशन, प्रणव भट्टड, रौनक एलवाल, हार्दिकराज सी. आर., प्रणव अश्वत, राजशेखर स्वामी, देव सिन्हा, आर्यन मावा, प्रणव बाबू, मन्मय एम., आर्यन इंचल, रोहित आर. व्ही., आदर्श डी. अर्स, आनंद अरुण पिल्ली, श्रीधर जगताप, कुशल गौडा, सिद्धेश असलकर, धीरज गौडा समावेश आहे. या संभाव्य खेळाडूंचे शिबिर सोमवारपासून बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर सुरू होणार असून, यातून 15 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या संघाचे प्रशिक्षक राजशेखर संबल, समी अर रेहमान, फिजिओ गौतम एच. एस. आहेत.