वार्ताहर/कास
परळी खोऱ्यातील सावली ता. सातारा गावच्या हाद्दीत रानडुक्कराची शिकार करून मांस विक्री करत असल्याची माहिती मिळताच वनविभागाने छापा टाकुन तब्बल सावली गावातील १६ जणांना रंगेहाथ पकडले असुन मांस जप्त करत संबधीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी सावली गावच्या हद्दीत रानडुक्कराची शिकार करून मासांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती सातारा वनविभागाला कळताच वनविभागाने पथक तयार करून त्या ठिकाणाला घेरा घातला व सावली गावच्या साजन साळुंखे, शंकर भिलारे, वंदना बादापुरे, जनार्दन साळुंखे, भाऊ साळुंखे, बळीराम साळुंखे, लिलाबाई साळुंखे, हणमंत साळुंखे, लक्ष्मण साळुंखे, नथुराम साळुंखे, विष्णु साळुंखे, रामचंद्र साळुंखे, सिद्धू साळुंखे, यशोदा साळुंखे, विष्णु साळुंखे, किशोर साळुंखे, या १६ आरोपींना तुकडे केलेल्या मासांसहीत अलगत जाळ्यात पकडले.
त्यांच्यावर वन्यप्राणी शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सावली गावच्या हद्दीत गावठी कुत्रे व काठ्यांच्या साह्याने शिकार होत असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, सातारा वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रोहोट वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सुनिल शेलार, साधना राठोड आदी करत आहेत.