प्रतिनिधी/ पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे मंगळवारी कोरोनामुळे 2 बळी गेले असून एकूण मृतांचा आकडा आता 690 झाला आहे. काल 161 नवीन कोरोनाबाधित सापडले तर 128 जण बरे होऊन घरी परतले. संशयित रूग्ण म्हणून 43 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 126 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे.
सध्या सक्रीय रूग्ण 1366 एवढे असून ते विविध हॉस्पिटलात कोविड सेंटरात उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण 48134 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 46068 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली-31, सांखळी 26, पेडणे-32, वाळपई-20, म्हापसा-40, पणजी-82, हळदोणा-22, बेतकी-40, कांदोळी-71, कासारवर्णे-6, कोलवाळ-15, खोर्ली-36, चिंबल-67, शिवोली-54, पर्वरी-102, मये-17, कुडचडे-15, काणकोण-39, मडगांव-113, वास्को-71, बाळ्ळी-15, कासांवली-57, चिंचिणी-45, कुठ्ठाळी-55, कुडतरी-36, लोटली-38, मडकई-28, केपे-26, सांगे-7, शिरोडा-15, धारबांदोडा-13, फोंडा-93, नावेली-31.
गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बरे होणाऱयांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे.
1 डिसेंबरपर्यंतचे कोरोना रूग्ण- 48124
1 डिसेंबरपर्यंतचे बरे झालेले रूग्ण- 46068
1 डिसेंबरपर्यंतचे सक्रीय कोरोना रूग्ण- 1366
1 डिसेंबरचे नवीन रूग्ण- 161
1 डिसेंबरचे बरे झालेले रूग्ण- 128
1 डिसेंबरचे कोरोना बळी-2
आतापर्यंतचे एकूण बळी- 690