संकेश्वर नगर परिषदेच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी ः बाजार कर वसुलीवरुन अधिकारी धारेवर
प्रतिनिधी / संकेश्वर
संकेश्वर शहराची हद्दवाड झाल्यामुळे विस्तारित भागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा सुधारीकरण योजनेकरीता सरकारकडे 17.70 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच शहरासह परिसरातील लोकवस्त्यांना शुध्द पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती नगर परिषदेचे अभियंता रविंद्र गडाद यांनी दिली.
बुधवारी नगर परिषदेत आयोजित बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सीमा हतनुरी होत्या. प्रारंभी दिवंगत नगरसेवक संजय नष्टी, कर्मचारी अमित उदोशी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर नूतन नगरसेवक नंदू उर्फ शिवानंद मुडशी यांचा सत्कार करण्यात आला.
बाजार करवसुलीचा बट्टय़ाबोळ
बाजार करवसुलीतून नगर परिषदेचे उत्पन्न वाढत होते. मात्र गत दोन वर्षात बाजार कर वसुलीचा तपशील पाहता उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घटले आहे. बाजार करवसुलीच्या नियोजनाचा बट्टय़ाबोळ झाल्याची तपशीलवार माहिती नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांनी दिली.
घर दिले पण हक्कपत्र नाही
विविध आवास योजनांमधून घरकुले देण्यात आली आहेत. मात्र 50 टक्केहून अधिक घरकुल लाभार्थ्यांना हक्कपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे घरांचा उतारा निघत नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना हक्कपत्रे द्या अशा सूचना नगरसेवक जितेंद्र मर्डी यांनी केल्या. यावेळी अधिकाऱयांनी नोंदवही गहाळ झाल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकाऱयांच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त करण्यात आला.
विविध भागांचे नामकरण करा
शहरातून गेलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे विविध टप्पे करुन त्यांना विविध नावे देण्यात यावी तसेच शहरातील विविध रस्त्यांचेही नामकरण करा, असा विषय सभापती सुनील पर्वतराव यांनी मांडला.
सीसी कॅमेरे बंदच
शहरातील सीसी कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. सीसी पॅमेरे दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच वैद्यकीय कचऱयाची वेळेवर विल्हेवाट होत नसल्याने गैरसोय होत आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारी नसल्याने सांडपाणी तुंबत आहे. याकडे अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी सूचना नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी केली.
लिंकरोडवरील अतिक्रमण जैसे थे
गेल्या दोन वर्षांपासून बसस्थानकनजीकच्या लिंक रोडवरील अतिक्रमण हटविण्याबाबत सूचना केल्या जात आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहेत. त्वरीत हे अतिक्रमण हटवा अशा सूचना नगरसेवक अमर नलवडे यांनी अधिकाऱयांना दिल्या. सोमवारी शहरातील प्रत्येक कुटुंबाला कचरा साठा करण्यासाठी डस्टबीनचे वाटप करण्यात येणार आहे. शिवाय त्याचदिवशी हिरण्यकेशी नदीवर गंगापूजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राजशेखर चौगला यांनी दिली. बैठकीस सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक उप