Tarun Bharat

बांगलादेशात बस अपघातात 17 ठार

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशमध्ये रविवारी एक भीषण बस अपघात झाला. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला, तर 30 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्मयता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बांगलादेशातील मदारीपूर भागात बसचे चाक पंक्चर झाल्याने हा अपघात झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास एमाद ट्रान्सपोर्टची बस मदारीपूरमधील एक्स्प्रेस वेवर दुर्घटनाग्रस्त झाली. अपघातसमयी बस भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगतच्या सखल भागात कोसळली. अपघातातील जखमींना वेगवेगळ्या ऊग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मदारीपूरचे पोलीस अधीक्षक मोहम्मद मसूद आलम यांनी सांगितले. अपघातग्रस्त बसमध्ये 43 हून अधिक प्रवासी होते. ते सर्वजण ढाका येथे जात होते.

Related Stories

ऑक्सफर्डची लस ठरणार 90 टक्के प्रभावी

Omkar B

पर्यावरण रक्षणासाठी ‘राइट टू रिपेयर’

Patil_p

फ्रान्स-ग्रीस यांच्यात महत्त्वाचा सामरिक करार

Patil_p

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

datta jadhav

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

रशियातील मॅकडोनाल्ड्सचे 850 आउटलेट बंद

Patil_p
error: Content is protected !!