Tarun Bharat

दक्षिण आफ्रिकेच्या नाइट क्लबमध्ये 17 जणांची हत्या

वृत्तसंस्था / केपटाउन

दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील पूर्व लंडन शहरात एका नाइट क्लबमध्ये 17 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पूर्व लंडनमधील घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीस तपास करत असल्याचे एका अधिकाऱयाकडून सांगण्यात आले. शहारापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावरील सिनरी पार्कमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल लोकांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मृतांचे वय 18-20 वर्षांदरम्यान असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या क्लबबाहेर जमा झालेल्या लोकांना शांत करत पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. या 17 जणांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही सामूहिक हत्येचा हा प्रकार असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. चेंगराचेंगरीमुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे.  मृतदेहांवर कुठल्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा दिसून आल्या नाहीत.

Related Stories

ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचा 6 मे रोजी राज्याभिषेक

Patil_p

ऑस्करमध्ये भारताचा ‘डबल धमाका’

Patil_p

ब्राझीलमध्ये बळींची संख्या 2 लाखांवर

Patil_p

नववर्ष जल्लोषावर कोरोनाचा प्रभाव

Patil_p

नववर्ष जल्लोषावर निर्बंध

Patil_p

60 तास झोपून जिंकली स्पर्धा

Patil_p