उचलण्यासाठी लागतात 5 लोक, गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद
गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड्सने जगातील सर्वात मोठय़ा बॉलपॉइंट पेनचा विक्रम नोंदविला आहे. या विक्रमाचे श्रेय भारतातील आचार्य मकुनरी श्रीनिवास यांना देण्यात आले आहे. त्यांनी या पेनवर भारतीय पौराणिक कथांमधील चित्रे कोरण्यात आली आहेत. हे जगातील सर्वात मोठे बॉलपॉइंट पेन असून ते 5.5 मीटर म्हणजेच 18.53 फूट लांबीचे आणि 37.23 किलो वजनाचे आहे. हे पेन सर्वसामान्य बॉलपॉइंट पेनपेक्षा 38 पट मोठे आहे.
गिनिज वर्ल्ड रिकॉर्डने स्वतःच्या इन्स्टाग्राम पेजवर या पेनचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या पेनची मोजणी हैदराबादमध्ये 24 एप्रिल 2011 रोजी करण्यात आली होती. बॉलपॉइंट पेनचा आविष्कार लॅडिसलॉ जोस बीरो यांनी केला होता. बीरो यांचा जन्म 29 सप्टेंबर 1899 रोजी झाला होता.
आचार्य मकुनरी श्रीनिवास यांनी स्वतःच्या नावावर विश्वविक्रम नोंद झाल्यावर आनंद व्यक्त केला आहे. लहान असताना माझी आई मला लिहिण्यासाठी पेन द्यायची. मी त्या पेनचा वापर करत एक दिवस मी जगातील सर्वात विचित्र पेन तयार करण्याची कल्पना करायचो. आता निर्माण केलेले पेन हे कांस्य धातूने तयार केले असून यात भारतीय नृत्याचे 9 प्रकारे आणि वाद्यांची चित्रे त्यावर कोरण्यात आली असल्याचे आचार्य यांनी सांगितले आहे.