लेडी गागाने 11 व्यांदा पुरस्कार पटकाविला
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या लॉस एंजिलिस शहरात रविवारी रात्री 62 वा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. सर्वाधिक 8 शेणींमध्ये नामांकन प्राप्त लिज्जोला ट्रूथ हर्ट्ससाठी बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्ससह 3 पुरस्कार मिळाले आहेत. तर बिली एलिशने 5 ग्रॅमी पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. 6 शेणींमध्ये नामांकन मिळविणारी तसेच पुरस्कार प्राप्त करणारी बिली ही (18 वर्षे) सर्वात कमी वयाची गायिका ठरली आहे.
सर्वोत्कृष्ट नवकलाकार, वर्षातील सर्वोत्तम गीत, रिकॉर्ड ऑफ द ईअर आणि अल्बम ऑफ द ईयर हे पुरस्कार बिलीने प्राप्त केले आहेत. सोहळय़ाचे सूत्रसंचालन 15 वेळा पुरस्कार प्राप्त करणाऱया ऍलिशिया कीजने केले आहे. तर मिचेल ओबामा यांना बेस्ट स्पोकन वर्ड अल्बमने गौरविण्यात आले आहे.
वयाच्या चौथ्या वर्षी लिहिले गीत
18 डिसेंबर 2001 रोजी जन्मलेली बिली ही अभिनेत्री तसेच गीतकार मॅगी बेअर्ड तसेच अभिनेता पॅट्रिक ओ’कॉनेल यांची मुलगी आहे. वयाच्या चौथ्या वर्षी बिलीने स्वतःचे पहिले गाणे लिहिले होते.
युद्धविरोधी संदेश
रेड कार्पेटवर अरब फॅशन कौन्सिलच्या ऍम्बेसिडर मेगन पोर्मर यांनी लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पेहरावावर ‘नो वॉर, लव्ह इराण’ असा संदेश नमूद होता. तर गायिका जॉय विला ब्राइटने स्वतःच्या पेहरावावर ट्रम्प 2020 असा संदेश दर्शविला होता.
पुरस्कार विजेत्यांची यादी…..
विजेते पुरस्कार गाणे/अल्बम
बिली एलिश….. सर्वोत्कृष्ट गीत……. बॅड गाय
लिज्जो…………. बेस्ट पॉप सोलो….. ट्रुथ हर्ट्स
डेव चॅपेल……… बेस्ट कॉमेडी अल्बम स्टिक्स अँड स्टोन्स
डेन-शाय………. डुओ ग्रूप परफॉर्मन्स स्पीचलेस
पीजे मार्टिन…… आर अँड बी साँग…. से सो
अँडरसन पाक…. आर अँड बी परफॉर्मन्स कम होम
कोस्टेलो-इम्पोटर्स……………………. टॅडिशन पॉप व्होकल लुक नाऊ
गॅरी क्लार्क……. रॉक परफॉर्मन्स….. दिस लँड
द कॅमिकल ब्रदर्स सर्वोत्कृष्ट नृत्य……. नो जियोग्राफी
डीजे खालिद….. बेस्ट रॅप…………… हायर
केज द एलिफेंट.. बेस्ट रॉक अल्बम…. सोशल कूस
मिचेल ओबामा. बेस्ट स्पोकन वर्ड…. बीकमिंग
बेयॉन्से………… बेस्ट म्युझिक फिल्म होमकमिंग
तान्या टकर बेस्ट कंट्री अल्बम व्हाईल आय…