इंग्लंडच्या स्मिथला सर्वात दुर्लभ सिंड्रोम
हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिटने काही वर्षांपूर्वी ‘क्यूरियस केस ऑफ बेंजामीन बटन’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात ब्रॅडची व्यक्तिरेखा जेव्हा जन्माला येते, तेव्हा वृद्ध असते, तर मरताना ती एका नवजात शिशूत रुपांतरित होते. काही अशीच कहाणी आहे स्मिथची.
इंग्लंडच्या वेस्ट ससेक्सची रहिवासी असणारी स्मिथ हिला जगातील सर्वात दुर्लभ सिंड्रोम आहे. स्मिथला हचिनसन प्रोगेरिया सिंड्रोम असून यामुळे ती एक वर्ष पूर्ण करताच तिचे शरीर आठ वर्षांनी मोठे हेते. याचमुळे 18 वर्षीय स्मिथचे शरीर 144 वर्षीय व्यक्तीसारखे झाले आहे.
17 जुलै रोजी या युवतीचा मृत्यू झाला आहे. तिचे वय केवळ 18 वर्षे होते, पण तिला पाहून कुणीच ती 18 वर्षाची असल्याचे म्हणू शकत नव्हते. स्मिथच्या मृत्यूवेळी तिचे 33 वर्षीय वडिल शेन विकेन्स, तिची आई आणि 25 वर्षीय मैत्रिण कार्टराइट तिच्यासोबत होते.
प्रोगेरियामुळे तिच्या हालचालींवर फरक पडला, पण जीवनाविषयी तिच्या उत्साहात कुठलेच अंतर आले नव्हते. गंभीर सिंड्रोम असूनही ती स्वतःच्या स्थितीबद्दल विचलित नव्हती. तिची इच्छाशक्ती अत्यंत मजबूत होती. तिने स्वतःच्या हिमतीने लोकांच्या मनात स्थान निर्माण केल्याचे स्मिथच्या आईने म्हटले आहे.
144 वर्षांचे शरीर असूनही स्मिथ स्वतःच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालावयाची. मे महिन्यात तिने स्वतःचा 18 वा जन्मदिन साजरा केला होता. यादरम्याने तिने स्वतःच्या पसंतीच्या कॉकटेल ड्रिंकचा आनंदही घेतला होता.
स्थिती अत्यंत प्रतिकूल असूनही स्मिथ कधीच मानसिकदृष्टय़ा नकारात्मक विचार करत नव्हती. ती खूपच नॉर्मल होती. तिचे शरीर भले 100 वर्षांहून अधिक वयाचे होते, पण मनाने ती 18 वर्षांचीच होती असे कार्टराइटने म्हटले आहे. ब्रॅड पिटचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या दुर्लभ स्थिती प्रोगेरियाला बेंजामीन बटन कंडिशन देखील म्हटले जाऊ लागले होते. हा अत्यंत दुर्लभ सिंड्रोम आहे, पण कुठल्याही मुलामध्ये दोन वर्षांच्या वयानंतर याचे निदान होत असते. सर्वसाधारणपणे या सिंड्रोममध्ये मुलांचे केस गळू लागतात, विकास थांबतो आणि ही मुले वयाच्या 14 वर्षांपर्यंत मृत्युमुखी पडत असतात.