1 लाखाच्या गुंतवणूकदारास बनविले 30 लाखाचा मालक ः सर्वात मोठी दुसरी कंपनी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीने 25 ऑगस्ट रोजी शेअर बाजारातील प्रवासातील 18 वर्ष नुकतीच यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. सदरची कंपनी शेअर बाजारात 25 ऑगस्ट 2004 रोजी लिस्टिंग झाली होती. शेअर बाजारातील प्रवासानंतर टीसीएसच्या समभागाने गुंतवणूकदारांना आजवरच्या काळात जवळपास 3000 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
यामध्ये सर्वसाधारणपणे टीसीएसच्या समभागांमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱया गुंतवणूकदारास आजच्या घडीला जवळपास 30 लाख रुपये मिळाले आहेत. टीसीएसचे शेअर 1.15 टक्क्यांनी घसरुन 3,218.00 रुपयावर बंद झाले. मागील एक वर्षांमध्ये या स्टॉकमध्ये 12.36 टक्क्यांची घसरण झाली आहे.
टीसीएसची अन्य कामगिरी
w क्वालिफाइड इंस्टीटय़ूशनल
बायर्स (क्यूआयबी)…… 7 पट
w नॉन इंस्टीटय़ूशनल बायर्स
(एनआयआय)…………. 19.21 पट
w रिटेल इन्वेस्टर्स……… 2.91 पट
w ऍप्लाइज…………….. 2.91 पट
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्या
कंपनी बाजारमूल्य
टीसीएस…………. 12 लाख कोटी
इन्फोसिस……….. 6.46 लाख कोटी
विप्रो…………….. 2.28 लाख कोटी
एचसीएल टेक…… 2.58 लाख कोटी
टेक महिंद्रा…………….. 1.04 लाख कोटी