Tarun Bharat

19 मार्चपासून अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा भारतदौरा

राजनाथ सिंग यांच्याशी करणार चर्चा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे संरक्षणमंत्री जनरल लॉयड जे. ऑस्टिन हे 19 ते 21 मार्चदरम्यान भारताच्या दौऱयावर असणार आहेत. जो बायडेन प्रशासनाने सत्ताग्रहण केल्यावर पहिल्यांदाच अमेरिकेचा मंत्री भारतात येत आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री भारतासह जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत.  ऑस्टिन यांच्या दौऱयाची घोषणा पेंटागॉनने बुधवारी केली आहे. पदग्रहण केल्यावर स्वतःच्या पहिल्या विदेश दौऱयाच्या अंतर्गत ऑस्टिन यांचा हा दौरा भारत-अमेरिका संबंधांची दृढता दर्शविणारा ठरणार आहे. ऑस्टिन हे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. ऑस्टिन यांच्या दौऱयात दोन्ही देशांकडून द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या पद्धतींवर चर्चा तसेच क्षेत्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, स्वतंत्र अन् मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्र राखण्याकरता विचारविनिमय केला जाणार आहे. हा दौरा चीनच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Stories

पाकिस्तानात अफगाणी राजदूताच्या मुलीचे अपहरण

datta jadhav

पाकिस्तानमध्ये रेल्वे-बस अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू

datta jadhav

माफ करणार नाही, विसरणार देखील नाही!

Patil_p

महामारीची तिसरी लाट

Patil_p

रशियन सैनिकांचे भ्याड कृत्य

Patil_p

लामा प्राण्याद्वारे प्राप्त सुक्ष्म अँटीबॉडी प्रभावी

Omkar B