Tarun Bharat

19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा ऋतिक सावंत कर्णधार

Advertisements

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावचा सुपुत्र

ओटवणे / प्रतिनिधी:

सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये गावचा सुपुत्र ऋतिक सत्यवान सावंत याची 19 वर्षाखालील ज्युनिअर भारतीय टेनिसबॉल क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणुन निवड करण्यात आली आहे. जम्मू काश्मिर येथे नुकत्याच झालेल्या 28 व्या ज्युनिअर राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ऋतिक सावंत याने महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत केलेल्या अष्टपैलू खेळाची दखल घेऊन त्याची राष्ट्रीय ज्युनिअर क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.

आग्रा येथे झालेल्या टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तर प्रदेश व टेनिसबॉल क्रिकेट फेडरशन ऑफ इंडिया, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या स्पर्धेत या 19 वर्षाखालील जूनियर भारतीय टेनिसबॉल क्रिकेट टीमची निवड करण्यात आली. ऋतिक सावंत याने याचवर्षी तमिळनाडूत कन्याकुमारी येथे झालेल्या नॅशनल टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या टीमचे नेतृत्व केले होते. ऋतिक सावंत याला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तथा टेनिस बॉल क्रिकेट प्रशिक्षक प्रकाश तांबिटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

ऋतिक सावंत उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाडू असून त्याने अनेक जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकाविल्यानंतर राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. किक बॉक्सिंग खेळासाठी त्याला दाणोलीतील बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

ऋतिक सावंत हा ओवळीये गावचे माजी सरपंच बळीराम सावंत यांचा नातू आहे. या निवडीबद्दल त्याचे विविध क्षेत्रातुन अभिनंदन होतं आहे.

Related Stories

वेंगुर्लेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ

Ganeshprasad Gogate

पंधरा लिपीमध्ये साकारले राष्ट्रगीत

NIKHIL_N

विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांबाबत विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय!

NIKHIL_N

कोकणातील कालबाहय़ शेती संस्कृतीचे ‘इकोप्रेंडली’ देखाव्यातून दर्शन

Patil_p

मालवणात 20 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरची निर्मिती

NIKHIL_N

‘जलजीवन मिशन’मध्ये 1,181 पाणी योजनांचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!