अभिनेत्री तापसी पन्नूचा चित्रपट
अभिनेत्री तापसी पन्नूच्या चित्रपटाची प्रतीक्षा तिचे चाहते करत असतात. अलिकडेच तापसीचा ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नव्हते. अशा स्थितीत तापसी आता नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एकता कपूर आणि अनुराग कश्यप यांचा न्यू एज थ्रिलर ‘दोबारा’ 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूचा हा चित्रपट लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि फँटासिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला होता.
अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाचे अनेक ठिकाणी कौतुक झाले आहे. दोबारा हा चित्रपट आता इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये दाखविला जाणार आहे. तापसीने यापूर्वी एकता कपूरच्या ‘मनमर्जिया’ या चित्रपटात काम केले होते. तर दोबारा चित्रपटात तापसीसह पावेल गुलाटी दिसून येणार आहे. दोबारा हा चित्रपट शोभा कपूर आणि एकता आर. कपूरच्या कल्ट मूव्हीजकडून निर्मित करण्यात आला आहे.