वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) विविध पदांसाठी 19 डिसेंबरला निवडणूक घेतली जाणार आहे. गुवाहाटीमध्ये आयओएची वार्षिक सर्वसाधारण बैठक 19 डिसेंबरला बोलाविण्यात आली आहे. या बैठकीवेळी या संघटनेच्या विविध पदाधिकाऱयांच्या पदांसाठी मतदानाद्वारे निवडणूक घेतली जाणार आहे.
विविध पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी आपले अर्ज 6 डिसेंबरपूर्वी पाठविणे जरूरीचे आहे. 6 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान इच्छुकांकडून अर्ज मागविले जाणार आहे. त्यानंतर विविध पदांसाठी अंतिम यादी 8 डिसेंबरला जाहीर केली जाईल. आयओएच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी राजीव मेहता यांना या संघटनेच्या घटनेनुसार परवानगी दिल्याचे समजते. राजीव मेहता हे आयओएचे सध्या सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.