सातारा जिह्यातील 7 खेळाडूंची निवड
प्रतिनिधी/ सातारा
दक्षिण विभागाच्या 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड अकलूज येथे पार पडली आहे. यामध्ये मुख्य संघात सातारा जिह्यातील 7 युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर स्थान मिळवले आहे. आर्य शहा याची उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे. तर साताऱयातील शिवराज माने, साहिल औताडे, अर्जुन वाघ, शुभंकर कुलकर्णी, संग्राम शिंदे, कौशल बडगावे यांनी मुख्य संघात स्थान मिळवले असून राखीव खेळाडूत झैद शेख याची निवड झाली आहे.
उदय डोके (सोलापूर), मयूर कांबळे (सातारा), नवनाथ डांगे (उस्मानाबाद) गणेश कुकडे (सांगली) या चार जणांच्या निवड समितीने 19 वर्षाखालील दक्षिण विभाग संघ जाहीर केला आहे. सदरची निवड ही सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद या दक्षिण विभागातील जिल्हा संघामधून झाली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे पुणे येथील विविध मैदानावर 19 मार्च पासून क्रिकेटचा थरार रंगत आहे. यामध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग आणि मध्य विभाग अशा पाच टीम तर पुण्यातील विविध निमंत्रित क्रिकेट स्पर्धा आयोजित करणारे यांचे 11 संघ असा 15 संघामध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.या सोळा संघांची चार गटात विभागणी करण्यात आली असून यामधून प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट 2 संघ पात्र ठरणार आहेत. त्यानंतर पुढे 8 संघात ही स्पर्धा सुरू राहणार आहे.
19 वर्षाखालील दक्षिण विभाग संघ
अभिषेक पवार, उस्मानाबाद (कर्णधार), आर्य शहा, सातारा (उपकर्णधार), शिवराज माने, साहिल औताडे, (यष्टीरक्षक), अनुराग कवडे, सयाजीराजे मोहिते, अर्जुन वाघ, ओंकार यादव, शुभंकर कुलकर्णी, गिरीश बोचरे, प्रतीक चितारे संग्राम शिंदे, आदित्य परबळकर, कौशल बडगावे, अथर्व चांदुरे, राखीव खेळाडू ः शशांक कांबळे, †िरतेश इंगवले, झैद शेख, प्रसाद इंगवले, नितीन बारपट्टे यांचा समावेश आहे.