वाळपई–होंडा मार्गावरील खड्डय़ांचा बळी : सिलिंडर गाडी उलटली. मोठा अनर्थ टळला.
वाळपई / प्रतिनिधी
वाळपई-होंडा मार्गावर कुंभारखण याठिकाणी दुचाकीची समोरासमोर टक्कर व सिलेंडरवाहू जीप उलटल्यामुळे गंभीर अपघात झाला. या अपघातांमध्ये सालेली येथील दत्तप्रसाद पुंडलिक गावकर या 19 वषीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. दत्तप्रसाद गावकर याच्या निधनामुळे सालेली परिसरात शोककळा पसरली आहे. रस्त्यावर मध्येच पडलेले दोन खड्डे या अपघातास कारणीभूत असल्याचे बाब समोर आलेली आहे .
यामुळे सदर खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दत्तप्रसाद पुंडलिक गावकर हा आपल्या ऍक्टिवा दुचाकी वाहनावरून वाळपई शहराकडे येत होता तर समोरून येणाऱया एका दुचाकीस्वार यांच्यादरम्यान समोरासमोर टक्कर झाली .कुंभारखण याठिकाणी जाणाऱया रस्त्याच्या अवघ्या अंतरावर हा अपघात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. दोघांच्याही दरम्यान जोरदार टक्कर झाल्यामुळे दत्तप्रसाद गावकर हा रस्त्यावर कोसळला व त्याच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली. यावेळी त्याला 108 रुग्णवाहिकेने सांखळी इस्पितळात नेण्यात येत असतात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. सदर अपघातामध्ये सापडलेला अन्य दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
सिलिंडरची जीप उलटली
दरम्यान, शहराकडून होंडा भागाच्या दिशेने जाणारी एका गॅस एजन्सीची भरलेली सिलिंडर जीप या अपघातामुळे उलटली. सदर जीप वाळपई दिशेने होंडा भागाकडे जात होती. यावेळी हा अपघात घडला त्यावेळी सदर जीप एका दुचाकीस्वाराच्या मागे होती. त्यावेळी चालकाने अचानकपणे ब्रेक लावल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व भरलेले सर्व सिलिंडर रस्त्यावर पडले व जीपही उलटली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी सिलिंडरला न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी सदर जीपची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून गाडीला इतर ठिकाणी बऱयाच प्रमाणात नुकसान झालेले आहे.
यासंदर्भातील माहिती मिळताच वाळपई पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान मयत दत्तप्रसाद गावकर यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हसऱया चेहऱयाचा दत्तप्रसाद
दत्तप्रसाद गावकर हा आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. भुईपाल येथील शाळेमध्ये त्यांनी आपले दहावीचे शिक्षण पूर्ण केले. हसऱया चेहऱयाचा दत्तप्रसाद गावकर याचा दुर्देची मृत्यू झाल्याची बातमी कळताच सालेली व भुईपाल परिसरामध्ये शोककळा पसरली .भुईपाल सरकारी शाळेमधील शिक्षकांनी व मुलांनी याबद्दल दुःख व्यक्त केलेले आहे. त्याच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर झळकल्या.
यासंदर्भात एका शिक्षकाने आपल्या भावना व्यक्त करताना दत्तप्रसाद गावकर याने शाळेच्यावतीने अनेक स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसे प्राप्त केली होती. दत्तप्रसाद गावकर याने इंग्रजी कविता करून अनेक बक्षिसे पटकावली होती.
त्याप्रमाणे टाकाऊतून टिकाऊ अशा स्पर्धेमध्ये त्यांनी विशेष पारितोषिक पटकावली होती. बुधवारी त्यांनी शाळेत जाऊन अनेक शिक्षकांची भेट घेतली होती. अचानकपणे त्याच्यावर नियतीने घाला घातल्याबद्दल दुःख व्यक्त होत आहे. दरम्यान सालेली गावावर ही दुःखाची छाया पसरलेली आहे. त्याच्या पश्चात एक बहीण आई व वडील असा परिवार आहे.
दोन खड्डय़ांनी घेतला जीव
दरम्यान होंडा वाळपई या प्रमुख मार्गावर कुंभारखण याठिकाणी रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन खड्डे पडलेले आहेत .सदर खड्डय़ांचा अंदाज येत नाही. अचानकपणे सदर खड्डय़ामध्ये गाडी पडल्यानंतर गाडीवरील चालकाचा ताबा जातो यामुळे अनेकवेळा दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागलेले आहे. मात्र दत्तप्रसाद गावकर याचा या खड्डय़ांनी जीव घेतल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. सदर खड्डे बुजवावेत, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले .सदर खड्डे बुजविले असते तर यदाकदाचित दत्तप्रसाद गावकर यांचा जीव वाचला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.