मे महिन्यातील आकडेवारी ः ग्रांट थॉर्नटनच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय कंपन्यांनी मे महिन्यात जवळपास 190 देवाणघेवाणीत एकूण 19.1 अब्ज डॉलरचे व्यवहार केले आहेत. यामध्ये मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत दुप्पट व्यवहार झाले आहेत. निम्म्यापेक्षा अधिकची हिस्सेदारी अदानी समूहाने काबीज केली आहे. सिमेंट कंपनी होल्सिमच्या 10.5 अब्ज डॉलरचे अधिग्रहणाचे व्यवहार यात असल्याची माहिती ग्रांट थॉर्नटन यांनी आपल्या अहवालातून दिली आहे.
आपल्या अहवालात म्हटले आहे, की भारतात सादर करण्यात आलेल्या अहवालात विलीनीकरण व खासगी इक्विटी आणि आयपीओअंतर्गत मे 2021 मध्ये 7.96 अब्ज डॉलरचे व्यवहार झाले असल्याचे म्हटले आहे. यासह एप्रिल 2022 च्या तुलनेत मे च्या दरम्यान एकूण व्यवहारांच्या मूल्यांपैकी 59 टक्के कमी झाले आहेत. एप्रिलमध्ये खासगी क्षेत्रातील दोन कंपन्या एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडच्या
दरम्यान जवळपास 40 अब्ज डॉलरचा भागीदारीचा व्यवहार झाला होता.
13 मोठे व्यवहार
प्राप्त अहवालनुसार अदानी समूहाकडून होलसिम एसीसी आणि अंबुजा सिमेंटच्या खरेदी व्यतिरिक्त मे 2022 मध्ये रिलायन्स आणि बोधी ट्री यांनी वियाकॉम 18 मध्ये दोन अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. या व्यतिरीक्त मेच्या दरम्यान 10 कोटी डॉलरपेक्षा अधिक 13 मोठे व्यवहार झाले असून याचे मूल्य 5.1 अब्ज डॉलर इतके होते.