बलुचिस्तान / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील जोब जिह्यात एक बस दरीत कोसळून रविवारी भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त बस रावळपिंडीहून क्वेट्टाला जात होती. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू केले. अपघातसमयी बसमध्ये 30 जण होते. मदत व बचावकार्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.