Tarun Bharat

‘हे’ १९ आमदार आहेत नॉट रिचेबल

Advertisements

मुंबई:-शिवसेनेचे ज्येष्ठ आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे नाराज असल्याची माहिती माहिती मिळत आहे. काल विधान परिषदेच्या मतदानानंतर एकनाथ शिंदे हे विधानभवनातून थेट गुजरातमधील सुरतला गेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षावर नाराज असलेले एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मोठी बाब म्हणजे एकनाथ शिंदे एकटे गेले नसून त्यांच्यासोबत त्यांचे निकटवर्तीय असलेले तब्बल १९ आमदार आणि पदाधिकारीही सुरतमधील एका हॉटेलात थांबले असल्याची सुत्रांची माहिती आहे.

तर दुसरीकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) हे देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सकाळीच देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अधिक वाचा : भाजपसोबत युती करा, तरच बंड मागे? शिवसेनेतील फुटीरवाद्यांची मागणी

एकनाथ शिंदेंसोबत ‘हे’ १९ शिवसेना आमदार (Shivsena MLA) सध्या सुरतमध्ये असल्याचे समोर येत आहे. या १९ आमदारांची संपूर्ण यादी

तर हे सर्व आमदार आहेत नॉट रिचेबल
१) स्वतः एकनाथ शिंदे, ठाणे
३) अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
३. शंभुराज देसाई – पाटण, साताराट
४. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद
५. उदयसिंह राजपूत – कन्नड, औरंगाबाद
६. भरत गोगावले – महाड, रायगड
७. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला
८.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली
९.विश्ननाथ भोईर – कल्याण पश्चिम
१०. संजय गायकवाड – बुलडाणा
११. संजय रायमूलकर – मेहकर
१२. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा
१३. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
१४. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
१५ संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ
१६. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
१७. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
१८. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
१९. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद

Related Stories

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

Rohan_P

उत्तर प्रदेशात ब्लॅक फंगसचे 1 हजार रुग्ण; 80 जणांचा मृत्यू

Rohan_P

संदीप देशपांडेंवर कारवाई करण्याचे गृह राज्यमंत्र्यांचे आदेश

Abhijeet Shinde

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर

Sumit Tambekar

नगराध्यक्षांचा बेंचसाठी साडे सतरा लाखांचा फंड

Patil_p

Sangli; नवविवाहिता आणि तरुणाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!