चंदिगढ / वृत्तसंस्था
पटियाला मध्यवर्ती कारागृहामधून 19 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल कारागृहाच्या बॅरेकमध्ये फरशी आणि भिंतींमध्ये छिद्र करून लपवून ठेवले होते. तुरुंग अधिकाऱयांनी विशेष तपास मोहीम हाती घेत सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलचा वापर कोणते कैदी करत होते यासंबंधीचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच सदर कैदी कुठे आणि कोणाशी बोलले होते? याचाही तपास कॉल रेकॉर्ड तपासून केला जाणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षकांनी दिली.