मुंबईः
इंधन क्षेत्रातील कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने डिसेंबरच्या तिमाहीअखेर 1960 कोटी रुपयांचा निव्वळ नफा पदरात पाडून घेतला आहे. पण मागच्या तुलनेत हा नफा 31 टक्के कमी असल्याची बाबही स्पष्ट करण्यात आली आहे. वर्षाच्या आधी समान अवधीत कंपनीने 28.28 अब्ज रुपयांचा नफा नोंदवला होता. सदरच्या तिमाहीत कंपनीने 12.81 दशलक्ष मेट्रीक टन इंधनाची विक्री केली आहे.