तोंडाला मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांचे अस्तित्व संपविण्यासाठी कर्नाटक सरकारने मराठी भाषेवर आणि संस्कृतिवर घाला घातला आहे. अल्पसंख्याक यांचे हक्क कर्नाटक सरकारने पायदळी तुडविले आहेत. लोकशाहीचा गळा घोटला आहे आणि मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती लादली. त्यामुळे 1 जून 1986 साली महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. त्या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 9 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांना सोमवार दि. 1 जून रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाभागातील मराठी जनतेने मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शहर व तालुका म. ए. समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ सकाळी 10 वाजता सर्वांनी जमावे, असे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे आणि तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी येताना मास्क घेवून यावे. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.