Tarun Bharat

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली

ऑनलाईन टीम/तरुण भारत

मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. तसेच संपूर्ण कंबर फुलांच्या पाकळ्यांनी सजवण्यात आली आहे. तर ही जागा बुरीअल वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारीत येते.

याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याच्या प्रेताचं दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलं. त्या ठिकाणच्या ओठ्याला एकंदरीत संगमरवरी मार्बल्स बसवण्यात आल्या आहेत. त्यावर एलईडी दिवे लावले आहेत. हे दिवे रात्रीच्या वेळी चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आले आहेत. एका कोपऱ्यात स्विच बोर्ड लावून या कबरीसाठी वीजपुरवठा केला जातो. तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरला इतकी व्हीआयपी वागणूक का? असा सवाल विचारला जात आहे.

हे ही वाचा : अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील युवती अखेर सापडली…

१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकुबला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ३० जुलै २०१५ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणात याकुबचा भाऊ टायगर मुख्य संशयित आरोपी आहे. मुंबई बॉम्बस्फोटात २५७ जणांनी आपला जीव गमावला होता. जवळपास १४०० हून अधिक नागरिक या स्फोटात जखमी झाले होते.

Related Stories

लोकांना कर्ज नको, थेट खात्यात पैसे द्या : राहुल गांधी

Tousif Mujawar

SL vs IND: क्रिकेटर क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण

Tousif Mujawar

कसबा बावड्यात युवकावर पूर्ववैमस्यातून खुनी हल्ला

Archana Banage

पाचगाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पाणी

Archana Banage

महाराष्ट्रात आतापर्यंत 23 हजार 548 पोलिसांना कोरोनाची बाधा 

Tousif Mujawar

राज्यात तुरळक पावसाचा इशारा

datta jadhav