Tarun Bharat

2 नव्या आयपीएल संघांना 24 डिसेंबरला मंजुरी शक्य

बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत आयसीसी प्रतिनिधी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक दि. 24 डिसेंबर रोजी होत असून यात आयपीएलच्या दोन नव्या प्रँचायझींना मंजुरी, आयसीसीमध्ये भारताचा प्रतिनिधी नेमणे व 3 नव्या राष्ट्रीय निवड समिती सदस्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे. याचबरोबर नवा उपाध्यक्ष निवडणे हा देखील या बैठकीचा मुख्य मसुदा असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या 21 दिवस आधी बैठकीतील 23 मुद्यांचा तपशील सर्व संलग्न घटकांना पाठवला आहे. या बैठकीत 2 आयपीएल संघांना मंजुरी देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यास यापुढे आयपीएल स्पर्धेत 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसून येणार आहेत.

नवे प्रँचायझी घेण्यासाठी अदानी समूह व संजीव गोएंकाचे आरपीजी समूह इच्छुक असल्याचे संकेत आहेत. दोनपैकी एक प्रँचायझी निश्चितपणाने अहमदाबाद असणार आहे. आयसीसी व आशियाई क्रिकेट समितीत भारताचा प्रतिनिधी निवडणे, हा देखील या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा असेल. या दोन्ही समित्यांवर जय शाह हे बीसीसीआयचे प्रतिनिधी असतील, असे सध्याचे संकेत आहेत.

याशिवाय, निवड समितीतील 3 नवे सदस्य नियुक्ती व निवड समिती अध्यक्ष निवडीच्या कार्यवाहीबद्दल यात प्रामुख्याने चर्चा अपेक्षित आहे. पंचांची उप-समिती व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीविषयी संलग्न मुद्दे यावेळी चर्चेत येऊ शकतात. 2021 मधील भारताचा क्रिकेट हंगाम, पुढील वर्षी आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी कर वादाबाबत सविस्तर चर्चा होऊ शकते. 2028 लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश असू शकतो. त्याबद्दलही या बैठकीत विचार होऊ शकतो. माहीम वर्मा यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदी निवडीची प्रक्रिया सुरु केले जाणे अपेक्षित आहे.

बैठकीतील मुख्य विषय

@उपाध्यक्षपदाची निवडणूक

@आयपीएल कार्यकारिणीतील 2 सदस्यांची निवड

@आयपीएलमधील 2 नव्या संघांना मंजुरी

@2028 ऑलिम्पिकमधील क्रिकेट समावेशाबद्दल चर्चा

@आयसीसी टी-20 वर्ल्डकप, फ्यूचर टूर्सबद्दल चर्चा

Related Stories

ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

Patil_p

भारतीय महिलांचा पाकला दणका

Patil_p

इचलकरंजी संघाकडे एसीए चषक

Patil_p

पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया बेनॉ-कादिर चषकासाठी लढणार

Patil_p

Tokyo Olympics : टेबल टेनिस- मनिका बत्राचा शानदार विजय

Archana Banage

जॉर्डनची भारतावर मात

Patil_p