Tarun Bharat

2 महिला न्यायाधीशांची अफगाणिस्तानात हत्या

काबूल

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्sय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महिला न्यायाधीशांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली आहे. काबूलच्या पीडी-10 जिल्हय़ात ही घटना रविवारी सकाळी घडली आहे. या हल्ल्यात 3 महिला जखमी झाल्या आहेत. या हल्ल्याने पूर्ण देश हादरून गेला आहे.

अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबान यांच्यात शांतता करारावरून चर्चा सुरू असतानाही अलिकडच्या काळात देशातील हिंसक घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. राजधानी काबूलमध्ये विशेषत्वाने हल्ल्यांमध्ये वाढ दिसून आली आहे. महत्त्वाच्या पदांवर आरुढ लोकांची हत्या घडवून आणत देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे हा या हल्ल्यांमागचा मुख्य उद्देश आहे.

Related Stories

जपानमध्ये सायकल्सचे डम्पयार्ड

Patil_p

इस्लामविरोधी द्वेषापोटी मुस्लिम कुटुंबाची हत्या

datta jadhav

मांजर ठरले बाइक रायडर

Patil_p

हक्कानी नेटवर्कच्या कमांडरची हत्या

Patil_p

युद्धात युक्रेनने घेतली ‘एआय’ची मदत

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2 कोटींवर

datta jadhav