Tarun Bharat

2 हजार वायुसैनिकांची फील्ड डय़ुटीवर रवानगी

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

वायुदलाने लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी कमांडर हेडक्वार्टरमध्ये (मुख्यालय) तैनात 2 हजार वायुसैनिकांना फील्ड डय़ुटीवर पाठविले आहे. या निर्णयामुळे वायुदलाच्या क्षमतेत 20 टक्क्यांची भर पडली आहे. तसेच फायटर स्क्वॉड्रनची मोहिमात्तक क्षमताही वाढणार असून वायुसैनिकांवरील तणाव कमी करता येणार असणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

या वायुसैनिकांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात तैनात करण्यात आल्याने फ्लाइट ऑपरेशन  पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित होईल. वायुदल सातत्याने स्वतःच्या क्षमतांच्या वृद्धीसाठी पावले उचलत आहे. वायुदल प्रमुख आरकेएस भदौरिया स्वतः या प्रक्रियेवर नजर ठेवून आहेत.

2019 मध्ये बालाकोट येथील एअर स्ट्राईकपासूनच वायुदल स्वतःची युद्धक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शस्त्रास्त्रांसह आवश्यक सामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. आकाशातून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रs, आणि आकाशातून जमिनीवर मारा करणारी शस्त्रयंत्रणा, स्पाइस-2000 बॉम्ब आणि स्ट्रम अँडीटँक गायडेड क्षेपणास्त्र खरेदी करण्यात आले आहे.

तामिळनाडूच्या तंजावरमध्ये पहिली लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात करण्यात आली असून यात सुखोई-30 एमेकआयचा समावेश आहे. हिंदी महासागराच्या देखरेखीत ही स्क्वाड्रन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे वायुदलाने म्हटले आहे. नौदल तसेच वायुदलालाही या स्क्वाड्रनमुळे सहाय्य प्राप्त होणार आहे. ही सर्व लढाऊ विमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.

सुलूरमध्ये तेजसची स्क्वाड्रन

तामिळनाडूच्या सुलूर वायुतळावर जुलै 2018 मध्ये स्वदेशी लढाऊ विमान तेजसची स्क्वाड्रन क्रमांक 45 फ्लाइंग डॅगर्स तैनात करण्यात आली आहे. तेजसची उड्डाण करणारी ही पहिली स्क्वाड्रन आहे.

Related Stories

पुलवामामधील हल्ल्यात एएसआय हुतात्मा

Patil_p

‘नव्या प्रयोगा’मुळे सुरक्षा, तरुणाईचे भविष्य धोक्यात

Patil_p

खर्च कमी करण्यासाठी पंजाब सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

फाशी 1 फेबुवारीला

Patil_p

नीरव मोदीचे प्रत्यार्पण पुन्हा रखडले

Patil_p

भारत बायोटेकची लस तिसऱया टप्प्यात

Patil_p
error: Content is protected !!