पाटणा
कम्युनिस्ट नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार 2 ऑक्टोबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल मागील काही काळापासून कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांना पक्षात सामील करण्यासाठी प्रयत्नशील होते.
कन्हैयाने 2019 ची लोकसभा निवडणूक बिहारमधील बेगूसराय मतदारसंघात भाकपच्या वतीने लढविली होती. पण कन्हैयाला भाजपचे फायरब्रँड नेते गिरिराज सिंह यांच्याकडून सुमारे 4 लाख मतांनी पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत कन्हैयाला 2.68 लाख तर गिरिराज यांना 6.88 लाख मते मिळाली होती. गुजरातच्या वडगामचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांना राज्य काँग्रेसमधील कार्यकारी अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.